मुलगी असल्यामुळे प्रवेश नाकारल्याने या भारतीय महिला क्रिकेटपटूने मुलगा बनून घेतले प्रशिक्षण

दक्षिण अफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाविरूध्द मंगळवारी सुरत येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात युवा खेळाडू शैफाली वर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. शैफाली हरियाणाच्या रोहतक येथील आहे. भारतीय टी20 महिला क्रिकेट संघात सर्वात कमी वयात पदार्पण करणारी ती खेळाडू आहे. 15 वर्षीय शैफालीने क्रिकेटचे प्रशिक्षण मुलगा बनून घेण्यास सुरूवात केली होती. कारण तिच्या शहरामध्ये मुलींसाठी क्रिकेट अॅकेडमी नव्हती.

(Source)

क्रिकेटसाठी वेडे असलेले तिचे वडिल संजीव वर्मा यांच्या सांगण्यावरून केस देखील कापले होती. कारण हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील सर्व क्रिकेट अॅकेडमीने तिला प्रशिक्षण देण्यास नकार दिला होता. शैफालीचे वडिल संजीव शर्मा सांगतात की, माझ्या मुलीला कोणीच प्रशिक्षण देण्यास तयार झाले नाही. मी त्यांना खूप आग्रह केला तरीही त्यांनी तिला घेतले नाही. अखेर मी तिचे केस कापून तिला एका अॅकेडमीमध्ये घेऊन गेलो व ती मुलगा असल्याचे सांगून एडमिशन केले.

(Source)

मुलांच्या संघातून खेळताना शैफालीला क्रिकेटच्या प्रती अधिक जवळीकता वाटू लागली. त्यानंतर शैफालीने शाळेत मुलींची क्रिकेट टीम तयार करण्याचा निर्णय घेतला. तिचे वडिल सांगतात, मुलांच्या विरोधात खेळणे सोपे नव्हते. कारण अनेकवेळा तिच्या हेल्मेटमध्ये मार लागत असे. मी घाबरायचो, मात्र तिने कधीही हार मानली नाही.

शैफालीचे क्रिकेटबद्दल पॅशन 2013 मध्ये सुरू झाले. त्यावेळी सचिन तेंडुलकर हरियाणामध्ये अखेरचा रणजी सामना खेळण्यासाठी आला होता. 9 वर्षीय शैफाली चौधरी बंसी लाल स्टेडियममध्ये बसून सचिन, सचिनचे नारे देत होती.

(Source)

शैफालीने मंगळवारी झालेल्या दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या सामन्यात 33 चेंडूमध्ये केवळ 46 धावा केल्या होत्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात तिला केवळ 4 चेंडूच खेळायला मिळाले होते. शैफालीने डोमेस्टिक सीझनमध्ये 1923 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतरच तिला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली.  शैफालीचे वडिल सांगतात, जेव्हा ती मुलांबरोबर क्रिकेट खेळायची तेव्हा शेजारी आणि नातेवाईक नाव ठेवत असे. ते म्हणायचे तुमची मुलगी मुलांबरोबर क्रिकेट खेळते, मात्र मुलींचे क्रिकेटमध्ये काहीही भविष्य नाही. मात्र आज तेच लोक कौतूक करताना थकत नाहीत.

Leave a Comment