इस्त्रो अंतराळात बनवणार स्वतःचे स्पेस स्टेशन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) सध्या एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. चांद्रयान – 2 च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील इस्त्रो करत आहे. इस्त्रो भारताच्या पहिल्या मानव मिशन गगनयानवर देखील काम करत असून, याच दरम्यान इस्त्रो प्रमुख के. सिवन यांनी आणखी एक मोठ्या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे.

डॉ. के सिवन यांनी अंतराळात भारताच्या स्पेस स्टेशनबद्दल माहिती दिली आहे. काही महिन्यांपुर्वीच सिवन यांनी भारत अंतराळात स्पेस स्टेशन बनवणार असल्याचे सांगितले होते. आता यासाठी इस्त्रो पुढील वर्षी स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (Spadex – Space Docking Experiment) करणार आहे.

(Source)

या प्रगोसाठी इस्त्रो दोन सेटेलाइट्सला एका पीएसएलवी रॉकेटच्या मदतीने अंतराळात पाठवेल. हे दोन सेटेलाइट्स मॉडेल अशा प्रकारे तयार करण्यात येतील की, जेणेकरून रॉकेट बाहेर आल्यानंतर देखील अंतराळात हे सेटेलाइट्स एकमेकांना जोडलेले असतील.  इस्त्रो प्रमुखांनुसार, सेटेलाइट्स जोडण्याची ही प्रक्रिया तशीच आहे, जशी इमारत बनवताना एका विटेला दुसरी विट जोडली जाते. छोट्या छोट्या वस्तू जोडून मोठा आकार तयार होतो. स्पेस स्टेशन बनवण्यासाठी देखील ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे.

(Source)

या प्रयोगाच्या यशस्वी परिक्षणानंतरच समजेल की, आपण स्पेस स्टेशनमध्ये गरजेच्या वस्तू आणि अंतराळ प्रवाशांना सुरक्षित रित्या पोहचवू शकेल की नाही. 2025 च्या आत हे रॉकेट सोडण्याची योजना आहे.

(Source)

सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस) पाच देशांनी मिळून बनवलेले आहे. या देशांमध्ये अमेरिका (NASA), रशिया (ROSCOSMOS), जापान (JAXA), युरोप (ESA) आणि कॅनेडा (CSA) यांचा समावेश आहे. या सर्वांना मिळून स्टेशन बनवण्यासाठी 13 वर्ष लागली होते. यासाठी देखील डॉकिंगचा वापर करण्यात आला होता. आयएसएससाठी एकूण 40 वेळा डॉकिंग करण्यात आली होती.

(Source)

या प्रयोगाची सर्वात कठिण गोष्ट म्हणजे, अंतराळात दोन सेटेलाइट्सची गती कमी करून त्यांना एकमेकांपासून जोडून ठेवणे. जर गती कमी झाली नाही तर, ते एकमेकांना धडकू शकतात. या प्रयोगासाठी इस्त्रोला सरकारने सध्या 10 कोटी रूपये दिले आहेत.

(Source)

स्पेस स्टेशनसाठी स्पेडेक्स हे एक प्रायोगिक मिशन असेल. यामुळे गगनयान मिशनवर कोणताही परिणाम होणार नाही. गगनयान डिसेंबर 2021 मध्ये होईल.

 

Leave a Comment