‘आरशातही दिसत नाही इम्रान खान यांच्या पत्नीचा चेहरा’

पाकिस्तानमध्ये अंधश्रध्देला सध्या जोरदार खतपाणी घातले जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला बुशरा बीबी यांच्याविषयी दावा करण्यात येत आहे की, त्यांचा चेहरा आरशामध्ये दिसत नाही. न्यूज एजेंसी एएनआयनुसार, हा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयातील एका व्यक्तीने केला आहे. बुशरा बीबी या इम्रान खान यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या पहिल्या महिला बुशरा बीबी यांचा चेहरा आरशामध्ये दिसत नाही. असा दावा पंतप्रधान कार्यालयातील एका व्यक्तीच्या हवाल्याने करण्यात आला आहे. याआधी वृत्त आले होते की, संयुक्त राष्ट्राच्या 74 व्या महासभेत भाग घेण्यापुर्वी इम्रान खान यांनी पत्नीबरोबर धार्मिक विधी केला होता. त्या त्यावेळी पुर्ण बुरख्यामध्ये दिसल्या होत्या.

असे सांगण्यात येते की, बुशरा या तंत्र-मंत्र आणि जादू-टोणा यावर विश्वास ठेवतात. बुशरा इस्लामिक कायद्याचे देखील कठोरपणे पालन करतात.

बुशराबद्दल पत्रकार तारिक फतेह यांनी देखील विचित्र दावा केला आहे.

https://twitter.com/_HiteshChopra/status/1178185450256683011

पाकिस्तान कार्यालयातील व्यक्तीकडून करण्यात आलेल्या या दाव्यावर सोशल मीडिया युजर्स खिल्ली उडवत आहेत.

मागील वर्षी सत्तेत येण्याआधीच सहा महिन्यांपुर्वी इम्रान खान यांनी बुशरा यांच्याशी विवाह केला होता.

Leave a Comment