युवराजच्या ‘चिकना चमेला’ लुकवर सानिया मिर्झाने केले ट्रोल

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने सोशल मीडियावर क्लीन शेव केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून टेनिसपटू सानिया मिर्झाने युवराजला ट्रोल केले. सानिया मिर्झाने सानियाने त्याला दाढी परत आणण्यास सांगितले आहे.

युवराज सिंहने नुकताच आपल्या नवीन लूकचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करताना युवराज सिंहने लिहिले की, ‘नवीन लुक, चिकना चमेला, मला पुन्हा दाढी वाढवायाला हवी का ?

युवराज सिंहच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या. यावर टेनिसपटू सानिया मिर्झाने देखील युवराजला ट्रोल केले. सानियाने कमेंट केली की,  चीन लपविण्यासाठी पाऊट करत आहेस का ??? आपली दाढी वाढव.

10 जुलै 2019 ला युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2011 मध्ये भारतीय संघाला विश्वचषक विजय मिळवून देण्यात युवराजची महत्त्वाची भूमिका होती.

 

Leave a Comment