एअरटेलच्या ग्राहकांना मिळणार 2 हजारांचा फायदा आणि मोफत TV सबस्क्रिप्शन

भारतीय टेलीकॉम बाजारात डाटा प्लॅनवरून युध्द सुरू असून, प्रत्येक कंपनी ग्राहकाला चांगला व स्वस्त प्लॅन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता एअरटेलने ग्राहकांसाठी 249 आणि 299 रूपयांचे प्रीपेड प्लॅन रिवाइज केले आहेत. कंपनी ग्राहकांना या प्लॅनमध्ये जबरदस्त सेवा देत आहे.

249 रूपयांचा प्रीपेड प्लॅन –

युजर्सला या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी 2 जीबी डाटा मिळेल. याचबरोबर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल सोबत एसएमएसची सुविधा देखील मिळेल. याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांसाठी दोन हजारांचा फायदा, एअरटेल अॅपचे सबस्क्रिप्शन आणि नॉर्टोन मोबाईल सिक्युरिटी ही सेवा देखील देईल. ग्राहक या प्रीपेड प्लॅनचा लाभ 28 दिवस घेऊ शकतील.

299 रूपयांचा प्रीपेड प्लॅन –

युजर्सला 299 रूपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस दरदिवशी अशी सुविधा मिळेल. याचबरोबर दरदिवशी 2.5 जीबी डाटा देखील मिळेल. या प्लॅनचा कालावधी हा 28 दिवसांचा असून, अन्य ऑफर्समध्ये कंपनी अॅमेझॉन प्राइम आणि विंक म्युझिक सर्विस देखील देणार आहे.

Leave a Comment