आता या प्रसिध्द गायकाबरोबर गायले रानू मंडल यांनी गाणे

इंटरनेट सेंसशन रानू मंडल यांनी आपल्या गाण्याने प्रत्येकालाच वेडे केले आहे. बेघर महिला ते एका रात्रीत सेलेब्रिटी झालेल्या रानू मंडल लवकरच त्यांच्या फॅन्ससाठी ‘कह रहीं हैं नज़दीकियां’ हे नवीन गाणे घेऊन येत आहेत. हे गाण्याला प्रसिध्द गायक उदित नारायण आणि हिमेशने देखील आवाज दिला आहे.

हिमेश रेशमियाने या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रानू मंडल यांच्यासोबत उदित नारायण रेकॉर्डिंग करताना दिसत आहेत.

या पोस्टमध्ये हिमेशने गाण्याची माहिती देत लिहिले की, माझ्या क्रिएटिव स्वाभावाने सांगितले की, आगामी चित्रपट हॅप्पी अँन्ड हार्डीतील क्लासिकल रोमँटिक गाणे ‘कह रहीं हैं नज़दीकियां’साठी मला सर्वात टॅलेंटेड आणि लेजेंडरी सिंगरला घ्यायला हवे. फिचरिंग उदित नारायण, रानू मंडल, हिमेश रेशमिया आणि पायल देव. म्युझिक इंडस्ट्रीचा हा खास दिवस लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त.

याआधी देखील रानू मंडल यांनी गायलेले ‘तेरी मेरी कहानी’ गाणे चाहत्यांना खूप आवडले होते.

 

 

Leave a Comment