युएनमध्ये इम्रान खान यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या या आहेत विदिशा मैत्रा

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतासंबंधीत अनेक गोष्टींवर खोटे मुद्दे मांडले. मात्र इम्रान खान यांचे हे खोटे जास्त वेळ टिकू शकले नाही. भारताने राइट टू रिप्लायचा वापर करत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानचे प्रत्येक वक्तव्य खोटे असल्याचे दाखवून दिले.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. दहशतवाद्यांची फॅक्ट्री चालवणाऱ्या पाकिस्तानकडून कोणत्याही सर्टिफिकेटची गरज नाही, असे विदिशा संयुक्त राष्ट्राच्या मंचावर म्हणाल्या. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या विदिशा मैत्रा कोण आहेत, जाणून घेऊया.

त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या सर्वात नवीन अधिकारी आहेत. विदिशा या 2009 च्या अधिकारी असून, 2008 मध्ये त्यांनी लोकसेवा परिक्षा पास केली होती. त्यांना संपुर्ण देशात 39 वी रँक मिळाली होती. 2009 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना ‘बेस्ट ऑफिसर ट्रेनी’चे गोल्ड मेडल देखील दिले होते.

‘पर्मानेंट मिशन ऑफ इंडिया टू द यूएन’ च्या अधिकृत वेबसाइटनुसार, संयुक्त राष्ट्रात त्या भारतीय मिशनच्या सर्वात जुनियर सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रात त्यांना सर्वात प्रथम सुरक्षा परिषद रिफॉर्म संबंधीत मुद्दे हाताळण्यास मिळाले. त्या युएनमध्ये सुरक्षा काउंसिल सुधारणा यासारखे मुद्दे बघतात.

Leave a Comment