दयाबेनाच्या परतीचा मुहुर्त ठरला, या दिवशी होणार एंट्री


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाबेनचे पात्र साकारत दिशा वकानीने गरोदरपणामुळे जी काही सुट्टी घेतली कि तेव्हापासून मागील दोन वर्ष दयाबेन शिवायच शो सुरु आहे. दयाच्या खास आवाजात टप्पू के ‘पपा ला हाक मारणे, गरबा खेळणे हे सारे काही प्रेक्षक मिस करत असताना या सर्व चाहत्यांसाठी खुशखबर समोर येत आहे.

या संदर्भात स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, दयाबेन येत्या नवरात्री विशेष भागातून मालिकेत पुन्हा एंट्री घेणार आहे. मालिकेचे निर्माते आसित मोदी आणि दिशा वकानी यांच्यात मागील काही काळापासून सतत कामाच्या अटींवरून मतभेद असल्याचे वृत्त समोर येत होते. पण या दोघांचे आता अखेरीस एक मत होऊन दिशाने निर्मात्यांच्या अटींवर काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

दिशाने मालिकेच्या सुरुवातीपासून दया बेन हे पात्र पार पाडले होते, तिने गरोदर असल्याने कार्यक्रमातून सुट्टी घेतली होती. मध्यंतरी दोन तीन वेळा अगदी काही वेळासाठी दिशा पुन्हा सीरियल मध्ये दिसली होती, पण त्यानंतर प्रेक्षकांना दिशाच्या वापसीचे काहीच संकेत मिळत नव्हते, याउलट तिच्या जागी नवीन अभिनेत्री येणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले होते. यासाठी अमी त्रिवेदी, विभूती शर्मा यांची नवे देखील चर्चेत होती. मात्र आता दिशाच्या वापसीने पुन्हा सिरीयल मध्ये रंगत येणार हे मात्र नक्की आहे.

Leave a Comment