फेसबुकवर आता दिसणार नाही कितीजणांनी लाईक केली तुमची पोस्ट


फेसबुक एका नवीन फीचरची चाचणी घेत आहे. याबद्दल आधीपासूनच अहवाल येत होते आणि आम्ही त्याबद्दल आपल्याला सांगितले. आता हे जवळजवळ निश्चित झाले आहे. फेसबुक अशा एका फीचरवर काम करत आहे जे वापरकर्त्यांना त्यांच्या फोटोंला मिळाले लाईक्स लपवू शकते. लाईक्सच्या आकडेवारीत सर्व प्रकारच्या प्रतिक्रियांचा देखील समावेश असतो.

जेव्हा आपण सेटिंग्ज बदलता, तेव्हा लाईक्स किंवा प्रतिक्रिया केवळ त्या वापरकर्त्यासच दिसतील ज्याने फेसबुकवरील पोस्ट किंवा फोटो शेअर केला असेल. याच वर्षात, इंस्टाग्रामसाठी देखील या प्रकारच्या वैशिष्ट्याची चाचणी घेण्यात आली होती. कंपनी गोपनीयता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेत आहे.

टेक क्रंचच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये लाइक काउंटिंगचे हे वैशिष्ट्य देणारे फिचर फेसबुक सर्वप्रथम सुरु करेल. याची सुरुवात 27 सप्टेंबरपासून होईल. टेक क्रंचने फेसबुकच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, कंपनी या वैशिष्ट्याबद्दल लोकांकडून अभिप्राय घेईल आणि यामुळे लोकांना आम्ही अधिक सुरक्षित फिचर देऊ शकतो.

या फिचरमुळे फेसबुकवर कमी लाईक्स मिळाल्यामुळे नाराज झालेल्या लोकांनाही याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. फेसबुक पोस्टवर कमी पसंती मिळाल्यामुळे बर्‍याच लोक पोस्ट टाकण्यास टाळाटाळ करतात किंवा पोस्ट डिलीट करतात असेही संशोधनातून समोर आले आहे. त्या लोकांना नवीन अनुभव देणे हे फेसबुकचे ध्येय आहे. सध्या त्याची चाचणी चालू आहे आणि हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी केव्हा उपलब्ध होईल याविषयी कंपनीने काहीही सांगितले नाही.

Leave a Comment