‘लाल कप्तान’मध्ये सोनाक्षीची देखील एंट्री


नुकताच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या आगामी आणि बहुप्रतिक्षीत ‘लाल कप्तान’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. सैफची नागा साधुच्या भूमिकेतील झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचीही खास भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील तिचा लूक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


या चित्रपटात सोनाक्षीची अगदी छोटी भूमिका पाहायला मिळणार आहे. तिचा लूक सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केला आहे. नवदीप सिंह हे ‘लाल कप्तान’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय हे करत आहेत. हा चित्रपट १८ ऑक्टोंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment