श्रीलंकेला मिळाली लसिथ मलिंगाची कार्बन कॉपी


कोलंबो : नुकत्याच पार पाडलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेट जगतातीला श्रीलंकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगानं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कोणताही फलंदाज यॉर्कर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाच्या गोलंदाजीपुढे आपला टिकाव ठरू शकलेला नाही. पण पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मलिगाने घेतला होता. कसोटी क्रिकेटमधून 2010मध्ये मलिंगा निवृत्त झाला होता. त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने मलिंगा आता फक्त आपले लक्ष संघाला विश्वचषककप जिंकून देण्याकडे केंद्रित करणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये मलिंगाने 101 तर 226 एकदिवसीय सामन्यात 338 विकेट घेतल्या आहेत. यातच आता श्रीलंकेला लसिथ मलिंगाची कार्बन कॉपी सापडली आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून मलिंगाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर मलिंगाच्या डुप्लिकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


श्रीलंकेला नवा मलिंगा श्रीलंकेत सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेटमध्ये सापडला आहे. या 17 वर्षीय गोलंदाजाचे नाव मथीशा पथिराना असे असून त्याची बॉलिंग स्टाईल हुबेहुब मलिंगासारखी आहे.

View this post on Instagram

😊😘🔇

A post shared by MATHEESHA PATHIRANA (@m.a.t.h.i.y.a_99) on


हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही मलिंगा आणि मथीशा यांच्यातील फरक कळणार नाही. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच मथीशाने 7 धावा देत 6 विकेट घेतल्या. मथीशा स्थानिक सामन्यात त्रिनिटी कॉलेजचे प्रतिनिधित्व करत होता. त्याच्या या गोलंदाजीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले आहे.

Leave a Comment