व्हायरल; या पोलिसाच्या कर्तृत्वाला सलाम करत आहेत नेटकरी

कर्नाटकातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने आपले काम नसतानाही रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी जमा झालेली माती व कचरा बाजूला केला. नेटकऱ्यांकडून या पोलिस कर्मचाऱ्याचे कौतूक केले जात आहे. सोशल मीडियावर युजर्स या पोलिस कर्मचाऱ्याला खरा हिरो असल्याचे म्हणत आहेत.

https://twitter.com/AkshayVandure1/status/1177182634687942656

अक्षय वेंदूरे नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी पोलिस कर्मचारी फावड्याचा वापर करून माती व कचरा बाजूला काढत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून, अनेक युजर्सनी बंगळुरू सिटी पोलिसांना टॅग करत या पोलिस कर्मचाऱ्याला सन्मानित करण्यास सांगितले आहे.

सोशल मीडियावर शेअर केल्यापासून या व्हिडीओ आतापर्यंत 34 हजार युजर्सनी बघितला आहे, तर 2 हजारांपेक्षा अधिक जणांनी ट्विट लाईक केले आहे.

आयपीएस ऑफिसर डी रूपा यांनी देखील या पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या कामाचे कौतूक केले. त्यांनी ट्विट केले की, पोलिसाचे हे काम नाही, तरीही त्यांनी हे केले.

अनेक युजर्सनी या पोलिस कर्मचाऱ्याचे कौतूक करत त्याला सन्मानित करण्यात यावे असे म्हटले. तर काहींनी पोलिसांना अशा प्रकारचे काम करण्यास सांगितल्याने नाराजी देखील व्यक्त केली.

Leave a Comment