जगातील नामांकित कंपन्यांमध्ये तिसऱ्या स्थानी ही भारतीय कंपनी


जगातील नामांकित कंपन्यांची यादी फोर्ब्सने नुकतीच जाहीर केली आहे. 17 भारतीय कंपन्यांना या यादीमध्ये स्थान मिळाले आहे. इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसी अशा काही प्रमुख कंपन्या त्यामध्ये आहेत. महत्वाचे म्हणजे आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही कंपनी या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर ग्लोबल पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी व्हिसा आणि दुसर्‍या क्रमांकावर इटालियन कार निर्माता कंपनी फेरारी आहे. या यादीमध्ये इन्फोसिस मागील वर्षी 31 व्या क्रमांकावर होती. ही कंपनी यावर्षी चक्क 3 ऱ्या क्रमांकावर असून भारतासाठी ही एक अभिमानस्पद बाब आहे.

फोर्ब्सने याबाबत सांगितले, इन्फोसिसच्या रँकिंगमुळे आशियातील परिस्थितीला एक मोठे स्थान प्राप्त झाले आहे. नेटफ्लिक्सचा वर्ष 2019 साठी जाहीर केलेल्या फोर्ब्सच्या यादीमध्ये चौथा क्रमांक आहे, त्यानंतर पे पल, मायक्रोसॉफ्ट, वॉल्ट डिस्ने, टोयोटा मोटर, मास्टरकार्ड, कोस्टको होलसेल टॉप 10मध्ये आहे. इतर भारतीय कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 22 व टाटा मोटर्स 31 व्या स्थानावर आहेत. पहिल्या 50 मध्ये या दोन भारतीय कंपन्यांना स्थान मिळाले आहे.

याशिवाय पहिल्या 250 मध्ये ज्या भारतीय कंपन्यांचे नाव आहे. त्यामध्ये, टाटा स्टील (10), लार्सन अँड टुब्रो (115)), महिंद्रा अँड महिंद्रा (117), एचडीएफसी (135), बजाज फिनजर्व (143), पिरामल एंटरप्राइजेज (149)), स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (153), एचसीएल टेक्नोलॉजीज (155), हिंडाल्को इंडस्ट्रीज (157), विप्रो (168), एचडीएफसी बँक (204), सन फार्मा इंडस्ट्रीज (217), जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (224), आयटीसी (231) आणि एशियन पेंट्स (248) यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे फोर्ब्सच्या या यादीत वर्चस्व आहे. 250 कंपन्यांच्या यादीमध्ये 59 कंपन्या अमेरिकेच्या आहेत. तसेच जपान, चीन आणि भारतही आघाडीवर आहेत. यामध्ये एकूण 250 कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या आशियातील आहेत. जगातील एकूण 2000 कंपन्यामधून या 250 कंपन्यांची निवड केली आहे.

Leave a Comment