रितेश-सिद्धार्थच्या ‘मरजावां’चा ट्रेलर रिलीज


‘मरजावां’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे दोघे पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. यामध्ये रितेशने नकारात्मक भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच मरजांवा या चित्रपटांचे पोस्टर रिलाज करण्यात आले होते. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झावेरी हे करत आहेत. रितेशची या चित्रपटातही नकारात्मक भूमिका आहे. विशेष म्हणजे तो या चित्रपटात कमी उंचीच्या व्यक्तिची भूमिका साकारत आहे. याआधी सिद्धार्थ मल्होत्राचेही वेगवेगळे लूक असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. तो काही दिवसांपूर्वीच ‘जबरिया जोडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण, आता तो पुन्हा एकदा ‘मरजावां’ चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री रकुल प्रित आणि तारा सुतारिया यांचीही या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

अलिकडेच ‘स्टूडंट ऑफ द ईयर २’ या चित्रपटातून ताराने बॉलिवूड पदार्पण केलं आहे. सिद्धार्थ या चित्रपटानंतर ‘शेहशाहं’ चित्रपटात झळकणार आहे. तर, रितेश देशमुखही ‘हाऊसफुल ४’मध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल.

Leave a Comment