मेहूल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा


न्युयॉर्क – पुढील काही दिवसांमध्ये पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून फरार झालेला आरोपी मेहूल चोक्सी भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अँटिग्वा या देशामध्ये हिरेव्यापारी मेहूल चोक्सी राहत असून अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्राऊनी यांनी चोक्सीने फसवणूक केल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारतीय अधिकारी त्यांची कधीही चौकशी करु शकतात, तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चोक्सीचे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे म्हटले आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदींवर पीएनबीमध्ये १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. नीरव मोदीने फसवणूक केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, आमच्याकडे त्याबाबत सबळ पुरावेही आहे. न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल, असे ब्राऊनी यांनी म्हटले आहे. संयुक्ता राष्ट्राच्या आमसभेला आले असता न्युयॉर्क येथे एएनआय या वृत्त संस्थेशी ते बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयात १७ जुन रोजी मेहूल चोक्सी यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अँटिग्वामध्ये मी राहत असून तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दोघांनीही पीएनबी घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशाबाहेर पलायन केले आहे. चोक्सी आणि नीरव मोदी यांना तपासासाठी देशामध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment