वॉग ब्युटी अवॉर्डमध्ये मलायकाने लावली आग


बॉलीवूडची छैया छैया गर्ल अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियात तिच्या हॉट फोटोज मुळे बरीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिचा सेक्सी अंदाज नेहमीच आकर्षित करतो. न केवळ तिच्या चाहत्यांसाठी तर बॉलिवूडकरांसाठी देखील तिचा ग्लॅमरस अंदाज चर्चेचा विषय असतो. नुकत्याच वॉग ब्युटी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर मलायका आपली बहिण अमृता अरोरासह दिसली. तिचा यावेळचा हॉट लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मलायकाने हे फोटो सोशल मिडियावर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी अशा काही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्या वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल.


बहुतांशी चाहत्यांनी या कमेंट्समध्ये एकच प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा दिली आहे, ज्यात तिच्या लूकचा अंदाज आपल्याला लक्षात येईल. सर्व चाहत्यांनी दिलेले आगीचे इमोजी दिले असून थोडक्यात मलायका या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे असे त्यांना सांगायचे आहे. या फोटोत मलायकाने पांढ-या रंगाचा गाऊन घातला असून हा गळ्यापासून थोडा खाली आहे. यात तिचे मेसी हेअर आणि गडद लिपस्टिकने तिच्या लूकला चार चांद लावले आहेत.


मलायका आणि अर्जुनने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या नात्याची ग्वाही दिली होती. त्यांच्या नात्याने तेव्हापासूनच सर्वांचे लक्ष वेधले. विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सुट्टीवर जाणे, प्रत्येक वेळी मलायका आणि अर्जुनने #CoupleGoals दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

Leave a Comment