लुंगी-चप्पल घालून गाडी चालवल्यावर चलान ?, नितिन गडकरी म्हणतात…

नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चलान कापले जात आहे. दंडाच्या रक्कमेबद्दल वाहनचालकांच्या मनात भिती आहे. याच पार्श्वभुमीवर अफवा पसरवली जात आहे की, अर्ध्या बाहीचा शर्ट आणि लुंगी-बनियन घालून गाडी चालवल्यावर दंड आकारला जात आहे. आता यावर केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या कार्यलयाच्या ट्विटर हँडलवरून या अफवांबाबत सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले की, अफवांपासून सावधान. नवीन मोटार वाहन कायद्यामध्ये अर्ध्या बाहीचा शर्ट आणि लुंगी-बनियन घालून गाडी चालवल्यावर चलान कापले जाईल असे कोणतेही प्रावधान नाही. ट्विटमध्ये म्हटले आहे की, गाडीमध्ये एक्स्ट्रा बल्ब ठेवणे, आरसा खराब असणे आणि चप्पल घालून गाडी चालवल्यावर चलान कापण्याचा कोणताही नियम नाही.

याआधी देखील नितिन गडकरी यांनी चलानबद्दल अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना फेक माहिती पसरवू नये असे आवाहन केले होते. गडकरींनी ट्विट केले होते की, मला वाइट वाटते की, आज पुन्हा आपल्या मीडियातील मित्रांनी रस्ते सुरक्षा कायद्या सारख्या गंभीर विषयाची मस्करी केली. माझे सगळ्यांना आवाहन आहे की, लोकांच्या आयुष्याशी जोडलेल्या या गंभीर प्रकरणावर कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती पसरवू नये.

1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू झाला असून, दंडाच्या रक्कमेत 10 पटीने वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये कायदा लागू करण्यात आला आहे, तर काही राज्यांनी अद्याप कायदा लागू केलेला नाही.

Leave a Comment