बिग बॉसच्या 13व्या सिजनसाठी सलमानला मिळणार एवढे मानधन


लवकरच बिग बॉस सिझन 13मध्ये सलमान खान सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. छोट्या पडद्यावरील हा मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल शो 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सलमान खान बिग बॉस 13 साठी जास्त पैसे घेत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर बिग बॉससाठी 400 कोटी रूपये सलमान खान घेत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण असा हिशोब केल्यास सलमान खान प्रत्येक विकेंडचे 27 कोटी रूपये घेत आहे. 15 आठवड्यासाठी बिग बॉस शो सलमान खान करणार आहे आणि याची एकूण फी 400 कोटी रूपये सांगितली जात होती. पण आता त्या बातमीची सत्यता समोर आली आहे.

एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, जवळपास 105 दिवस सलमान खानचा शो बिग बॉस सिझन 13 चालणार आहे. म्हणजेच 15 आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या शोमध्ये सलमान खान प्रत्येक विंकेड शनिवार आणि रविवारी दिसेल. सलमान खानने गेल्या सिझनमध्ये प्रत्येक विकेंडसाठी 11 कोटी रूपये फी घेतली होती. म्हणजेच त्याने पूर्ण सिझन जवळपास 165 कोटी रूपये मानधन घेतले होते. सलमान खान यावेळी प्रत्येक आठवड्याला 13 कोटी रूपये घेईल. त्यामुळे बिग बॉस सिझन 13 साठी सलमान खानची एकूण फी 195 कोटी रूपये सांगितली जात आहे.

गेल्या 10 वर्षांपासून सलमान खान बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे आणि यावेळी सुद्धा तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. बिग बॉस सिझन 13 चे लॉन्चिंग इव्हेंट सोमवारी मुंबईत पार पडला. या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात केवळ सेलिब्रेटी कंटेस्टेंटच दिसणार आहे. यावेळी शोमध्ये कॉमनरसाठी दरवाजे बंद असतील.

Leave a Comment