सौंदर्याची खाण असलेल्या मर्लिन मन्रोच्या अखेरच्या फोटोंचा होणार लिलाव


कलाविश्वात आजवर अनेक सौंदर्यवतींनी प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने भूरळ घातली आहे. त्यातील कोणी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले, तर कोणी सौंदर्याच्या व्याख्या बदलल्या. या साऱ्यामध्ये हॉलिवूडमधील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री मर्लिन मन्रोचे नाव नाव विसरुन चालणार नाही. अनेकांच्या काळजाचा ठोका मर्लिन मन्रोचे नाव घेतले तरी चुकतो.

विशेष म्हणजे ही अभिनेत्री आज आपल्यात नसली तरीही तिच्या आयुष्याची जितकी वर्षे तिने या चित्रपटसृष्टीला दिली, त्यांच्या बळावर मर्लिनला सर्वांच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले. अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशा या मादक सौंदर्यवतीविषयी समोर आली आहे.

मर्लिनचा १९६२ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. तिने फार कमी वयातच या जगाचा निरोप घेतला. तिने मृत्युच्या काही दिवस आधीच ‘लूक’ मासिकासाठी Douglas Kirkland या कॅनेडियन छायाचित्रकाराकडून फोटोसेशन करवून घेतले होते. नोव्हेंबर महिन्यात बेवर्ली हिल्स येथे ही दोन छायाचित्र काढण्यात आली होती. Douglas Kirklandकडून टीपण्यात आलेल्या या दोन छायाचित्रांपैकी एका छायाचित्रात ती झोपलेल्या अवस्थेत वरच्या दिशेला पाहताना दिसत आहे. तर, ती दुसऱ्या एका फोटोमध्ये उशीला पकडून दिसत आहे.

पण आता सूत्रांच्या माहितीनुसार मर्लिनची ही दोन अखेरची अधिकृत छायाचित्रे आहेत. याच छायाचित्रांचा येत्या काळात ग्लोबल ऑक्शन हाऊस क्रिस्टीकडून लिलाव होणार आहे. यासोबतच Douglas Kirkland चा हॅसलब्लेड ५००सी कॅमेरा आणि लेंसचाही लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव २९ ऑक्टोबरला होणार आहे.

Leave a Comment