केवळ 6,499 रुपयात मिळत आहे हा दमदार स्मार्टफोन


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन रेडमी 8ए लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 5000 एमएएचची बॅटरी आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

(Source)

या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचची आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 720×1520 पिक्सल आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रँगन 439 प्रोसेसर आहे. याचबरोबर फोनमध्ये 2/3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देखील मिळेल. डिस्प्लेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5  प्रोटेक्शन आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000 एमएएचची बॅटरी दिली असून, यासोबत 18W चा फास्ट चार्जर देखील मिळेल. यामध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील मिळेल.

(Source)

किंमती बद्दल सांगायचे तर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 6,499 रूपये आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 6,999 रूपये आहे. 29 सप्टेंबरपासून या फोनची विक्री सुरू होईल.

Leave a Comment