‘हाऊसफुल्ल ४’मधील अक्षय, रितेश आणि बॉबीचा फर्स्ट लूक


‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटाची स्टार कास्ट काय असेल याचा उलगडा काही दिवसांपूर्वीच झाला होता. पण नेमक्या कोणत्या भूमिका हे कलाकार साकारणार आहेत याबद्दलची उत्सुकता वाढली होती. यावरचाही पडदा आता उघडला गेला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांच्या व्यक्तीरेखा असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल ४ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशात आता इतर कलाकारांच्या व्यक्तीरेखा कोणत्या असतील याच्या प्रतीक्षा आहेत.


अक्षय कुमार ‘हाऊसफुल्ल ४’मध्ये बाला आणि हॅरी ही व्यक्तीरेखा साकारत आहे. एका पोस्टरवर बाला, शैतान का साला असे लिहिण्यात आले आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये हॅरीच्या चेहऱ्यावर फोटो फ्रेममधील बाला हात ठेवताना दिसत आहे.


रितेश देशमुख ‘हाऊसफुल्ल ४’च्या दुसऱ्या पोस्टरमध्ये दिसत आहे. यातील पहिल्या पोस्टरमध्ये तो नर्तकी बांगडू महाराजच्या भूमिकेत दिसत असून दुसऱ्या पोस्टरमध्ये रॉच्या व्यक्तिरेखेत दिसत आहे.


धर्मपुत्रा आणि मॅक्सच्या भूमिकेत बॉबी देओल हा दिसणार आहे. त्याचेही पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. तर निर्मिती साजिद नादियाडवाला यांची असणार आहे. येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला १८० कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment