जगाच्या दोन दिवस आधी भारतात प्रदर्शित होणार ‘जोकर’


सध्या जगभर बहुचर्चित जोकर या हॉलिवूड चित्रपटाची भरपूर चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण हा चित्रपट जगाच्या आधी दोन भारतात रिलीज करण्याचे निश्चित झाले आहे. हा चित्रपट आता २ ऑक्टोबरला भारतात रिलीज होईल.

या चित्रपटाचे स्क्रिनिंग काही आठवड्यापूर्वी व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलमध्ये पार पडले होते. चित्रपट पाहून प्रेक्षकांनी सलग ८ मिनिटे स्टँडिंग ओव्हेशन दिली होती.


चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वी रिलीज करण्यात आला होता. तेव्हा प्रत्येकाने श्वास रोखून तो पाहिला. जोकिन फोयनिक्स या अभिनेत्याने साकारलेला जोकर पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.

जोकरचा ट्रेलर पाहून जगभरातील प्रत्येक समिक्षकांनी आपल्या उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. जोकर चित्रपट हा असा चित्रपट आहे, की ज्यामुळे कलाकारांची कारकिर्द, भूमिका, व्यक्तीरेखा यांना कलाटणी मिळू शकते. व्हेनिस फिल्म फेस्टीव्हलला मिळालेल्या प्रतिसादानंतर, विशेषतः ८ मिनिटांच्या स्टँडिंग ऑडिशननंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता जगभरातील प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे.

Leave a Comment