सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आमिरच्या लेकीचा हा फोटो


हिंदी सिनेसृष्टीत बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने पदार्पण केले असून अभिनयापेक्षा इराने दिग्दर्शनाला पसंती दिली. ती सध्या मालिकांचे दिग्दर्शन करण्यात व्यस्त आहे. ती याशिवाय मॉडेलिंगमध्येही आपले नशीब आजमावत आहे. सोशल मीडियावर इरा सक्रिय असून ती स्वतःचे लेटेस्ट फोटो सतत शेअर करत असते. इराने नुकतेच एक फोटोशूट केले. त्यातील तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. इरा या फोटोंमध्ये फारच बोल्ड दिसत आहे. तिचे हे लेटेस्ट फोटो पाहून ती कोणत्याही अभिनेत्रीला हॉटनेसमध्ये मात देऊ शकते यावर कोणीही शंका घेणार नाही.

इराने फोटोत गडद मेकअपसोबत लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘सॅटरडे नाइट वाइब.’ इराने आधीच सांगितले की तिला अभिनयात फारस स्वारस्य नाही. दिग्दर्शनामध्ये तिला करिअर करायचे आहे. तिने याआधी नाटकाच्या निर्मात्या सारिकासह फोटो शेअर केला होता.


फोटो शेअर करताना इराने म्हटले की, कधीही हा पाऊस थांबावा असे मला कधीच वाटत नाही. जेव्हाही आम्ही सराव करतो तेव्हा पाऊस पडतो. पण मला माझी निर्माती कधीच पावसात चालू देत नाही. मी यावेळी त्यांची माझ्यासोबत येण्यासाठी कशीतरी मनधरणी केली.

ज्या नाटकाचे दिग्दर्शन इरा करणार आहे ते ग्रीकमधील एका पौराणिक कथेवर आधारित आहे. या नाटकाचे नाव यूरिपिड्स मेडिया असे आहे. युवराज सिंगची पत्नी हेजल कीच या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. इराने याबद्दल सांगताना हेजलसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, तिने हा म्हटले. मैत्रिणीपेक्षाही एक अभिनेत्री म्हणून तुझ्यासोबत काम करण्यावर मी आनंदी आहे.

Leave a Comment