काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल ब्रूना अब्दुल्लाहने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीशी संबंधीत एक महत्वाची माहिती आता तिने शेअर केली आहे. सोशल मीडियावर तिने एक फोटो पोस्ट केला असून त्यात तिने बाळाला पाण्यात जन्म दिल्याचे म्हटले आहे. ब्रूना मुलगी आणि पतीसोबत या फोटोत दिसत आहे.
ब्रूनाने फोटो शेअर करून लिहिले आहे की, गरोदर राहण्याअगोदरच मी विचार केला होता की, बाळाला मी पाण्यातच जन्म देईन. मला असे वाटते होते की, या जगात कोणत्याही औषधांशिवाय माझे बाळ बाहेर यावे. फक्त नैसर्गिकरित्या त्या बाळाचा जन्म व्हावा असे मला वाटते होते. अगदी शांत ठिकाणाचा मी विचार केला होता, जिथे मी माझ्या बाळाला अगदी नैसर्गिकरित्या जन्म देईन. मी खूप नशिबवान आहे की, मला हे सगळे करता आले.
आपल्या मुलीच्या जन्माची गोष्ट ब्रूनाने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. मी माझी आई, पती आणि डॉक्टरांच्या मदतीने मुलीला गरम पाण्यात जन्म दिल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. या पद्धतीसाठी मी स्वतःला तयार केले. गरोदरपणात योग्य आहार, मेडिटेशन आणि पुरेसा व्यायाम केला आहे. याबाबत मोठी सगळी माहिती मिळवली होती. यासारख्या अनेक गोष्टी ब्रूनाने शेअर केल्या आहेत.
एका हेल्थ अवेअरनेस कॅम्पेनच ‘मिसिंगआय’शी मॉडेल ब्रूना ही जोडलेली आहे. ब्रूनाने या कॅम्पेनमार्फत आयोडीन संदर्भातील सर्व प्रश्न उभे केले आहेत. 31 ऑगस्ट रोजी ब्रूनाने गोंडस मुलीला जन्म दिला. या मुलीचे नाव इसाबेला असे आहे. आई झाल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलल्याचे ब्रूना सांगते. मला विश्वासच बसत नाही की, मी कुणावर एवढे प्रेम करू शकते, असे ब्रूना म्हणते.