बघा फेडरर गुरूजींची नदालला शिकवणी

टेनिसपटू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या दोघांना एकमेकांविरूध्द खेळताना बघणे चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. दोन्ही खेळाडू संपुर्ण वर्षभर एकमेकांविरूध्द खेळतात. मात्र एकमेकांना हरवण्यासाठी मेहनत करणारे हे दोन्ही खेळाडू लावेर कपमध्ये सोबत खेळतात.

नदाल आणि फेडरर लावेर कप स्पर्धेत युरोपच्या संघाकडून खेळतात. लावेर कपने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये रॉजर फेडरर नदालच्या कोचची भूमिका पार पाडत आहे. यावेळी त्यांच्या सोबत बीजॉर्न बॉर्ग हे देखील दिसत आहेत.

राओनिकविरूध्दच्या सामन्यात ब्रेक दरम्यान नदाल बेंचवर बसलेला होता. पहिला सेट 6-3 ने जिंकल्यानंतर नदाल दुसऱ्या सेटमध्ये 3-4 असा पिछाडीवर होता. नदाल पिछाडीवर पडत असल्याचे लक्षात येताच फेडरर तेथे येत नदालला काही टिप्स देताना देखील दिसला.

त्याने नदालने सांगितले की, स्पिन कर, स्लाइस कर,… जुन्या दिवसांप्रमाणे. हे ऐकून फेडरर देखील हसू लागला. राफेल नदाल आणि रॉजर फेडररचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला.

या सामन्यात नदालने राओनिकवर 6-3, 7-6 अशी मात केली.

 

Leave a Comment