‘या’ दिवशी रिलीज होणार इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’


कॅन्सरवर उपचार घेऊन बॉलिवूड अभिनेता इरफान खान भारतात परतला असून तो बऱ्याच काळापासून पडद्यापासून दुर होता. पण तो आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तो सध्या त्याच्या आगामी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

‘हिंदी मीडियम’चा ‘अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट सिक्वेल आहे. करिना कपूर खानदेखील या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार असल्यामळे चाहत्यांनाही या चित्रपटाची आतुरता आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २० मार्चला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदजानिया हे करत आहे. करिना कपूर आणि इरफान खान व्यतिरिक्त डिंपल कपाडिया आणि राधिका मदन या दोघीही या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाबद्दलची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.


या चित्रपटात करिना कपूर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, राधिका मदन ही इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसेल. इरफान खान चंपक नावाचे पात्र साकारणार आहे. त्यानेही त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता.

Leave a Comment