दीपवीरचा हा अवतार पाहून तुम्हीही लावाल कपाळाला हात


नेहमीच काही ना काही कारणांमुळे बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी चर्चेत असतात. या दोघांनी नुकतीच आयफा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली. पण सर्वांच्या नजरा यावेळी या दोघांच्या लुकवर लागून राहिल्या होत्या.

दीपिकाने आयफा अवॉर्ड फंक्शनसाठी पर्पल कलरचा ऑफ शोल्डर आणि लांब ट्रेल असलेला ड्रेस घातला होता. पण रणवीर नेहमी प्रमाणे ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन असलेल्या अतरंगी लुकमध्ये दिसला.

नेहमीच दीपिकाचा फॅशन सेन्स हा चर्चेचा विषय असतो. पण तिचा आयफा लुक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात शादी के साइड इफेक्ट म्हणजे नेमके काय हे येईल.

नेहमीच अशाप्रकारच्या अतरंगी ड्रेसमध्ये रणवीर दिसतो आणि विशेष म्हणजे दीपिका त्याच्या प्रत्येक लुकची निवड करते, असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्यामुळे कोणाचा इफेक्ट कोणावर झाला आहे हे समजायला मार्ग नाही.

फक्त रणवीरच अशा लुकमध्ये सुरुवातीला दिसत असे. पण आता मागील काही दिवसांपासून दीपिका सुद्धा त्याच्यासारख्याच अतरंगी लुक्समध्ये दिसत असल्यानं ‘संगतीचा परिणाम’ असाच सर्वांचा सूर आहे.

Leave a Comment