रानू मंडलचे ‘हे’ गाणे ऐकून तुम्हाला पडेल लता मंगेशकर यांचा विसर!


सध्या सोशल मीडियावर रेल्वे स्टेशन आणि रस्त्यांवर गाणे गात भीक मागून त्यावर आपली उपजिविका करणाऱ्या रानू मंडल व्हायरल सिंगर झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी नुकतेच प्लेबॅक सिंगर म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून त्यांचे पहिले वहिले गाणे ‘तेरी मेरी कहानी’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सध्या या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता रानू यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला त्यांच्या पहिल्या गाण्याचाही विसर पडेल.


रानू यांचा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ त्यावेळचा आहे. ज्यावेळी त्या स्टार सुद्धा झाल्या नव्हत्या. रानू 1985 मध्ये रिलीज झालेला ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील ‘एक राधा एक मीरा’ हे गाणे गाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. त्या या व्हिडीओमध्ये खूपच साध्या वेषात दिसत आहेत. त्यावर अंदाज लावला जाऊ शकतो की हा व्हिडीओ रानू रेल्वे स्टेशनवर गाणे गात भीक मागत असत त्यावेळचा आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या पहिल्या व्हिडीओमध्ये दिसल्या होत्या तशाच दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Comment