या कंपनीचा मोबाईल वापरतात नरेंद्र मोदी


नुकताच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 69 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी त्यांना फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. कोणत्या कंपनीचे नेटवर्क मोदी वापरतात याबाबतही अनेकांना जाणून घ्यायचे असते. पण तुम्हाला माहित आहे का मोदी कोणत्या कंपनीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरतात.

अॅपलचा iPhone 6 फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात, अशी माहिती आहे. कारण त्यांना आयफोन ६ (iPhone 6 Series) सीरीज वापरताना २०१८ मध्ये चीन आणि दुबईच्या दौऱ्या दरम्यान पाहण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया मोहिमेनंतर, देशात स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ झाली. पंतप्रधान मोदींचा ग्राफ सोशल मीडिया साइट्सवर इतर अनेक राजकारण्यांहून अतिशय पुढे आहे. मोदींचे ५ कोटींहून अधिक फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. फेसबुकवर त्यांना जवळपास ४.५ कोटी यूजर्स फॉलो करतात. त्याशिवाय इन्स्टाग्रामवरही त्यांचे २.८३ कोटीच्या जवळपास फॉलोवर्स आहेत. मोदी सोशल मीडियावर फॉलोवर्सच्या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ट ट्रम्प यांच्यापेक्षाही पुढे आहेत.

कोणत्या कंपनीचे सिमकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरतात, याबाबतही त्यांच्या चाहत्यांना दोन वर्षांपूर्वी माहिती मिळाली. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. त्या स्क्रिनशॉटमध्ये वोडाफोनचे नेटवर्क दिसले होते. त्याच्याच आधारे, पंतप्रधान मोदी वो़डाफोन कंपनीचे सिमकार्ड वापरत असल्याचे बोलले जाते. पंतप्रधान मोदीच्या विश्वासातील व्यक्ती आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा अॅपल एक्सएस (iPhone XS) फोन वापरत असल्याची माहिती आहे. अॅपलने आयफोन एक्सएस जवळपास एक वर्षांपूर्वी लॉन्च केला होता.

Leave a Comment