सर्वांदेखत आलियाने बॉडीगार्डला फटकारले


सध्या आपल्या चित्रपटाबरोबरच अभिनेता रणबीर कपूर असलेल्या रिलेशनशिपमुळे अभिनेत्री आलिया भट्ट खूप चर्चेत आहे. तिचा रणबीरला मिठी मारतानाचा व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाला होता. अनेकदा तिच्या चाहत्यांसोबत आलिया अगदी सहज वावरताना दिसते.

पण सध्या एक असा व्हिडिओ तिचा व्हायरल झाला आहे. ती ज्यामध्ये आपल्या बॉडीगार्डला फटकारताना दिसत आहे. आलियाचा व्यवहार हा कायमच सौम्य राहिलेला आहे. पण असे काय झाले? ज्यामुळे आलियाला आपल्या बॉडीगार्डला सगळ्यांसमोर ओरडावे लागले.

सध्या आलियाचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आलिया भट्ट या व्हिडिओत आपल्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्याचे दिसत आहे. तिचे फॅन्स अगदी सुरूवातीपासूनच तिची सेटवर वाट पाहताना दिसत असताना ती गाडीतून उतरताच बॉडीगार्ड तिला घेरून घेतात.

View this post on Instagram

#aliabhatt on location

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


आलियाला हीच गोष्ट खटकलेली दिसत आहे. कारमधून आलिया उतरताच मीडियाकडे पाहून हसते पण पुढे जाऊन ती बॉडीगार्डवर भडकते. आलिया मागे राहते आणि याची जाणीव बॉडीगार्डला पुढे गेल्यावर होते. त्यानंतर ते लगेच मागे येतात पण हेच आलियाला खटकते आणि ती त्यांच्यावर भडकते.

इंस्टाग्रामवर आलियाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी म्हटले की, तू समोरच्याचा आदर केलास तरच तुझा आदर केला जाईल. आलिया चित्रपट आणि पैशाने भारावली आहे यासारखे अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment