आयफा अवार्ड्स २०१९मध्ये यांनी मारली बाजी


मुंबई – मायानगरी मुंबईत नुकताच सिनेसृष्टीतील प्रतिष्ठीत मानला जाणारा ‘आयफा पुरस्कार २०१९’ चा सोहळा पार पडला. अभिनेत्री आलिया भट्ट हिला या पुरस्कार सोहळ्यात ‘राझी’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर सिंहला ‘पद्मावत’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला आयुष्मान खुरानाच्या ‘अंधाधून’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना मिळाला. ‘धडक’ चित्रपटासाठी इशान खट्टरला सर्वोत्कृष्ट डेब्यू तर, सारा अली खानला केदारनाथ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांचा जलवा या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळाला. यामध्ये सलमान खान, विकी कौशल, रणवीर सिंग, कॅटरिना कैफ, राधिका आपटे, करण जोहर, आयुष्मान खुराना, नीना गुप्ता, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा- देशमुख, ताहिरा कश्यप, मौनी रॉय, माधुरी दिक्षीत, प्रिती झिंटा आणि इतर कलाकारांचा समावेश होता. मुंबईत यंदा पहिल्यांदाच आयफा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्यामुळे बॉलिवूड कलाकारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मागच्या वर्षी आयफा पुरस्कार बँकॉक येथे पार पडला होता.

आयफा पुरस्कार विजेत्यांची पूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट – राजी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – श्रीराम राघवन (अंधाधून)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंग (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (राजी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार – ईशान खट्टर (धडक)
सर्वोत्कृष्ट पदार्पणीय पुरस्कार – सारा अली खान (केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट कथा – श्रीराम राघवन, पुजा लढा सुरती, अरिजीत बिस्वास, योगेश चंदेकर आणि हेमंत राव (अंधाधून)
सर्वोत्कृष्ट लिरिक्स – अमिताभ भट्टाचार्य (धडक)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – हर्षदीप कौर आणि विभा सराफ ( दिलबरो-राजी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अरिजीत सिंग ( ऐ वतन – राजी)
सिनेसृष्टीतील योगदान – सरोज खान आणि सय्यद इश्तियाक अहमह

Leave a Comment