पीव्ही सिंधूशी लग्न करण्यासाठी या आजोबांचा अर्ज


खेळाडूंचे चाहते आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या टोकाला जातील हे सांगणे अवघड. अगदी जगाच्या पाठीवर असे वेडे चाहते सर्वत्र आहेत. तामिळनाडू मधील रामनाथपुरम जिल्ह्यातील एक आजोबा भारताची बॅडमिंटन स्टार आणि विश्व विजेती पीव्ही सिंधू हिच्या प्रेमात असे वेडे झाले आहेत की त्यांनी पीव्ही सिंधू बरोबर लग्न करून द्या अन्यथा तिचे अपहरण करेन असा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दिला आहे.

मलायस्वामी असे या आजोबांचे नाव आहे. जिल्ह्याधिकारी कार्यालयात जनसुनावणी सुरु असताना या आजोबांनी जिल्हाधिकाऱ्याना हा अर्ज दिला. त्यावेळी त्यांनी सिंधू आणि स्वतःचा एक फोटो या अर्जाला जोडला होता. अर्जात ते म्हणतात, मी १६ वर्षाचा आहे. माझा जन्म ४ एप्रिल २००४ रोजी झाला आहे. सिंधूच्या करियरमुळे मी खुपच प्रभावित झालो आहे. मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे तेव्हा जरूर ती तजवीज करा. अन्यथा मी तिचे अपहरण करेन. मिळालेल्या माहितीनुसार या आजोबांचे मानसिक स्वास्थ तपासण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी दिले आहेत.

Leave a Comment