मोदींना बिल गेट्स फाउंडेशनचा मानाचा पुरस्कार


येत्या २४ सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशन तर्फे दिले जाणारे ग्लोबल गोलकिपर अॅवॉर्ड दिले जाणार आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भारतात लाखो शौचालये बांधून जनतेत स्वच्छता जागृती केल्याच्या कार्याबद्दल मोदी यांना हे अॅवॉर्ड दिले जात असून त्यावर मानवाधिकार आणि समाजसेवी लोकांनी टीकेची झोड उठविली आहे.

मोदी यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक देशांची मानाची अॅवॉर्ड दिली गेली आहेत. फिलीप कोटलर राष्ट्रपती पुरस्कार, सोल शांती पुरस्कार, संयुक्त राष्ट्राचा चँपियन ऑफ द अर्थ पुरस्कार याचा त्यात समावेश आहे. वार्षिक ग्लोबल गोलकिपर पुरस्कारासाठी मोदींची निवड केल्याप्रकरणी बिल गेट्स म्हणाले, स्वच्छ भारत अभियान सुरु होण्यापूर्वी भारतात ५० कोटी जनतेला शौचालय सुविधा नव्हती. मात्र आता लाखोंच्या संख्येत शौचालये बांधली गेली आहेत. अजून खूप मार्गक्रमणा करायची आहे पण मोदींच्या स्वच्छता अभियानाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. हे अन्य देशांसाठी आदर्श उदाहरण आहे.

मोदी यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल शांती नोबेल पुरस्कार मिळालेले मेरिद फग्वेदर यांनी बिल गेट्स यांना पत्र लिहून टीका केली आहे. ते म्हणतात मोदी भारतात सत्तेवर आल्यापासून भारत धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. तेथे मानवाधिकारांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. तुमचे फौंडेशन जीवन संरक्षित करणे व असमानता या विरुद्ध लढण्याचे काम करते मग मोदींचे निवड कशी केली गेली? तेथे जम्मू काश्मीर आणि आसाम मध्ये जे चालले आहे ते मानवाधिकारांच्या विरुद्ध आहे.

द. आशियाई अमेरिकी समूहानेही बिल यांना मोदी यांची पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल टीकेचे लक्ष्य बनविले आहे. त्याच्या पत्रात जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम रद्द केल्यापासून ८० लाख काश्मिरी नजरकैदेत आहेत. त्याच्या बाहेरच्या जगाशी संबंध राहिलेला नाही. हे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे असे नमूद केले गेले आहे.

Leave a Comment