आता फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करा व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स


व्हॉट्सअ‍ॅपने अँड्राइड युजर्ससाठी एक खास फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला फेसबुक स्टोरीजमध्ये देखील शेअर करू शकतील. फेसबुक अनेक दिवसांपासून फेसबुक मॅसेन्जर, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्रामला एकत्र इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करण्याच्या स्टेप्स –

  • सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅपवर माय स्टेट्स पर्यायावर जा.
  • त्यानंतर ज्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला तुम्हाला फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करायचे आहे त्याच्या बाजूच्या हॅमबर्गर आयकॉनवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला शेअर टू फेसबुक असा पर्याय दिसेल.
  • त्यानंतर तुम्हाला डिफॉल्ट प्रायव्हेसी सेटिंगमुळे तुमचे फेसबुक प्रोफाईल दिसेल.
  • त्यानंतर तुम्ही तुमचे स्टेट्स फेसबुकवर शेअर करू शकाल.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्टेट्स शेअर करण्याआधी प्रायव्हेसी अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला पब्लिक, फ्रेंड्स अँन्ड कनेक्शन आणि हाइड स्टोरी असे पर्याय दिसतील. या पर्यायातील एक पर्याय निवडल्यानंतर तुम्ही शेअर नॉववर क्लिक करून स्टेट्स सहज शेअर करू शकाल.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सप्रमाणेच फेसबुकची स्टोरीज 24 तासांसाठी एक्टिव असेल. फेसबुक स्टोरी म्हणून शेअर करण्यात आलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स हे स्क्रीनशॉट प्रमाणे दिसेल.

 

Leave a Comment