आता हिंग्लिशमध्ये बोलणार अॅमेझॉन अॅलेक्सा


नवी दिल्ली : तुम्ही आता अॅमेझॉन अॅलेक्सासोबत हिंदी भाषेतही बोलू शकता. अॅमेझॉनने अॅलेक्साच्या या नव्या फीचरची दिल्लीत घोषणा करताना म्हटले की, आता अॅलेक्ससोबत युझर हिंदी आणि हिंग्लिशमध्येही बोलू शकतात. भारतातील हजारो अॅलेक्सा युझर आता या फीचरमुळे अॅलेक्साला हिंदीमध्ये गाणे सुरु करण्यासाठी, न्यूज अपडेटसह इतरही कमांड देऊ शकतात. एको (Echo) फॅमिलीचे सर्व व्हॉईस कंट्रोल्ड डिवायसेसमध्ये अॅलेक्सा हिंदी उपलब्ध करुन दिले आहेत.

युझरला अॅलेक्सासोबत हिंदीत बोलण्यासाठी सर्वात आधी ‘Alexa help me set up hindi’ कमांड द्यावी लागेल. सध्याचे एको डिवाईस युजर्स अॅलेक्सा अॅपच्या सेटिंगमध्ये दिलेल्या लँग्वेज ऑप्शनमध्ये जाऊन हिंदी भाषा निवडू शकतात. तर Echo Show युझर्सला यासाठी सेटिंग सेक्शनमध्ये जाऊन स्क्रीन वरुन खालच्या दिशेने स्वाईप करावी लागेल. विशेषत: हे फीचर भारतीय युझरसाठी आणले आहे. कारण येथे बहुतांश घरात हिंदी आणि इंग्लिश भाषा बोलली जाते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

युझरला अॅलेक्साकडून बेस्ट म्युझिक एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनीने gaana.com सह अनेक म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसोबत हातमिळवणी केली आहे. आता युझरना बॉलिवूडची गाणी ऐकण्यासाठी केवळ ‘अॅलेक्सा बॉलिवूड के लेटेस्ट गाने सुनाओ’ (अॅलेक्सा बॉलिवडचे लेटेस्ट गाणी ऐकव) अशी कमांड द्यावी लागले. अशाचप्रकारे तुम्हाला किशोर कुमार यांची गाणी ऐकण्यासाठी ‘अॅलेक्सा किशोर कुमार के गाने सुनाइए’ ही कमांड देऊ शकता. गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीही हिंदीमध्ये कमांड द्यावी लागेल. सोबतच अॅलेक्सा गाण्याची संबंधित माहितीही तुम्हाला देते.

हिंदीत अॅलेक्सा आल्याने युझरना अनेक सोयी मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही अॅलेक्साला प्रश्न विचारण्यासोबतच अलार्म सेट, कॅलेंडर चेक, न्यूज अपडेट, स्पोर्ट्स स्कोअरसह आणखी बरीच कामं करु शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अॅलेक्सा देऊ शकते. अॅलेक्साला येणाऱ्या सणांची तारीख तुम्ही विचारु शकता. सोबतच जर घरात मुले असतील तर त्यांचा गृहपाठ करुन घेण्यासाठीही अॅलेक्साची मदत घेऊ शकता. अॅलेक्सा गणित, सामान्य ज्ञान आणि विज्ञानाच्या प्रश्नांचीही उत्तरे देऊ शकते. एवढेच नाही तर तुम्ही अॅलेक्साला शेअर बाजार आणि सोन्याचे दर यांसारखे प्रश्नही विचारु शकता.

Leave a Comment