मेट्रो प्रवासावर खिलाडी अक्षय कुमार खुश


बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून त्याच्या मेट्रो प्रवासाची झलक त्यात दिसत आहे. मेट्रोच्या या प्रवासावर अक्षय खुपच खुश झाला असून तो लिहितो ज्या प्रवासासाठी मला दोन तास लागणार होते तो अवघ्या २० मिनिटात पूर्ण झाला.


त्याचे झाले असे की अक्षयचे घाटकोपर येथे शुटींग सुरु होते. शुटींग नंतर त्याला वर्सोवा येथे जायचे होते पण ट्रॅफिकची माहिती घेतली तेव्हा ट्राफिक जाम असल्याने किमान दोन तास या प्रवासासाठी लागणार होते. तेव्हा दिग्दर्शकाने मेट्रोने प्रवास कर असा सल्ला दिला. सुरवातीला अक्षयने तो नाकारला पण थोड्या वेळाने त्याने हा चान्स घेण्याचे ठरविले. दोन बॉडीगार्ड आणि दिग्दर्शक राज याच्यासह अक्षय मेट्रोत चढला आणि एका कोपऱ्यात चुपचाप उभा राहिला. मेट्रोतील काही प्रवाशांनी त्याला ओळखले पण बाकीच्यांनी ओळखलेही नाही.

अक्षय सांगतो हा अनुभव खुपच छान होता. मेट्रोमुळे प्रवास सुखाचा आणि वेगाने झाला. विशेष म्हणजे पावसातही काही त्रास झाला नही. त्याबद्दल दिग्दर्शक राज याचे आभार. अक्षय सध्या गुड न्यूज या चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त असून त्याच्यासोबत करीना कपूर आणि दिलजित दोसांज या सहकलाकार आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०१९ मध्ये रिलीज होणार आहे.

Leave a Comment