कब्बडी स्पर्धेसाठी बक्षीस ठेवला बकरा


जगभरात अनेक स्पर्धा सतत होत असतात. स्पर्धा म्हटली की बक्षिस आलेच. मग कधी ती रोख रक्कम असते, कधी एखादी वस्तू तर कधी चषक. काही प्रसिद्ध स्पर्धा खास चर्चेत असतात कारण त्यात मिळणारी रक्कम भलीदांडगी असते. छतीसगढ़च्या गरीयाबंद जिल्ह्यात अशीच एक स्पर्धा नुकतीच पार पडली आणि त्यातील बक्षिसे विशेष चर्चेचा विषय ठरली आणि ही स्पर्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली.

१५ सप्टेंबर रोजी वरील ठिकाणी कब्बडी स्पर्धा आयोजित केली गेली. त्यासाठी खास पत्रके छापून विजेत्यांना कोणती बक्षिसे मिळणार याची माहिती दिली गेली. बक्षिसे वाचून केवळ राज्यात नाही तर देशभरात ही बातमी चर्चेत आली. छतीसगढ़च्या गरीयाबंद जिल्ह्यात गादर गावी ही कबड्डी स्पर्धा होती. त्यात विजेत्याला एक जिवंत बकरा, उपविजेत्याला २० किलो कोंबड्या बक्षीस म्हणून दिल्या गेल्या तर तीन नंबरच्या विजेत्याला १५ किलो मासे आणि चार नंबरच्या टीमला चक्क २०० अंडी असे बक्षीस होते. यात कुठल्या टीमने कोणते बक्षीस मिळविले याची माहिती समजू शकलेली नाही.

Leave a Comment