नवा भयपट घेऊन येत आहेत विक्रम भट्ट


दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी आजवर ३० हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी असंख्य चित्रपटांचे लेखन केले आहे. तसेच त्यांच्या नावावर सुमारे २५ वेबसिरीज आहेत. त्यातच भट्ट यांनी आता नव्या चित्रपटाची तयारी केली असून त्यांचा ‘घोस्ट’ असे शीर्षक असलेला चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.


आगामी ‘घोस्ट’ चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेले आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे हे गुढ पोस्टर आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.

Leave a Comment