बॉलीवूडच्या या अभिनेत्री घेतात सर्वाधिक मानधन


स्त्रीप्रधान चित्रपटांची निर्मिती सध्या बॉलिवूडमध्ये केली जात असल्यामुळे अभिनेत्री फक्त हिरोइन म्हणून मर्यादित राहिल्या नाहीत तर त्यांच्या अभिनयालाही वाव मिळाला. त्याचबरोबर त्या प्रमुख भूमिकांमध्येही दिसू लागल्या. याचाच परिणाम म्हणून या अभिनेत्रींनी आपल्या मानधनात वाढ केली. आम्ही आज तुम्हाला बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींबाबत सांगणार आहोत.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत बॉलीवूड क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना राणावतचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. एका चित्रपटासाठी ती तब्बल 15 कोटी मानधन घेते.

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अभिनेत्री दीपिका पादुकोण आहे. एका चित्रपटासाठी दीपिका 14 कोटी एवढे मानधन घेते. लवकरच ती मेघना गुलजारच्या ‘छपाक’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मागच्या बऱ्याच काळापासून ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा बॉलिवूडपासून दूर आहे. ती लवकरच ‘द स्काय इज पिंक’ मधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. प्रियांकाचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्यां अभिनेत्रींमध्ये तिसरा क्रमांक लागतो. एका चित्रपटासाठी ती 13 कोटींचे मानधन घेते.

लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री करिना कपूर येणार आहे. ती एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. एका चित्रपटासाठी करिना 11.5 कोटी रुपये मानधन घेते. ‘अंग्रेजी मीडियम’ व्यतिरिक्त करिना ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ या दोन चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

सध्या भारत चित्रपटामुळे अभिनेत्री कतरिना कैफ चर्चेत आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत कतरिना पाचव्या क्रमांकावर आहे. एका चित्रपटासाठी ती 11 कोटी रुपये मानधन घेते. कतरिना लवकरच अक्षय कुमार सोबत ‘सूर्यवंशी’मध्ये दिसणार आहे.

एका चित्रपटासाठी फॅशनिस्टा सोनम कपूर 10.5 कोटी एवढे मानधन घेते. तिचा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये सहावा क्रमांक लागतो. तिचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.

शक्यतो स्त्रीप्रधान भूमिकांना अभिनेत्री विद्या बालन प्राधान्य देते. एका चित्रपटासाठी विद्या 9.5 कोटी एवढे मानधन घेते. ती लवकरच इंदिरा गांधीच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

‘साहो’मुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सर्वाधिक चर्चेत होती. ती साउथ सुपरस्टार प्रभास सोबत या चित्रपटात झळकली होती. श्रद्धा एका चित्रपटासाठी 9 कोटींचं मानधन घेते.

क्रिकेटर विराट कोहलीशी लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने कोणताही नवा चित्रपट साइन केलेला नसल्यामुळे ती बॉलिवूड सोडणार की काय अशी शंका उपस्थित होत आहे. एका चित्रपटासाठी अनुष्का 8 कोटींचे मानधन घेते.

सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री आलिया भटची गणती केली जाते. लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका चित्रपटासाठी आलिया 7.5 कोटींचे मानधन घेते.

Leave a Comment