सोशल मीडियात व्हायरल होत आहे जशोदाबेन-ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा फोटो


कोलकात्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मंगळवारी अचानक कोलकात्ता विमानतळावर भेट झाली. सध्या सोशल मीडियारवर त्यांच्या या अचानक भेटीचा फोटो व्हायरल होत आहे.

दिल्लीला ममता बॅनर्जी या निघाल्या होत्या. त्यांची भेट त्यावेळी विमानतळावर जशोदाबेन यांच्याशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडच्या धनबादमध्ये जशोदाबेन या गेले 2 दिवस यात्रा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या परतत असताना कोलकात्ता विमानतळावर त्यांची भेट झाली.

या दोघींमध्ये भेट झाल्यानंतर आनंदवार्ता झाली. आपुलकीने त्यांच्यात संवाद झाला. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी या भेटीवेळी जशोदाबेन यांना भेटवस्तू म्हणून साडी दिल्याचेही सांगण्यात येत आहे. मंगळवारच्या या भेटीनंतर बुधवारी ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार होत्या. त्यांच्याशी राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे त्यावेळी सांगितले.

Leave a Comment