रिलीज पूर्वीच रानू मंडल यांच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ


काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया स्टार रानू मंडल यांचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे रिलीज झाल्यानंतर त्यांचे आणखी एक ‘आदत’ नवे गाणे आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. हिमेशने या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल शेअर केला होता. त्यानंतर या गाण्याचा म्यूझिक ट्रॅक आता पुन्हा एकदा हिमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर जो सध्या खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर रानू यांचा हा व्हिडीओ शेअर करताना हिमेशने लिहिले, रानू मंडल यांचा आवाज खूपच गोड आहे. मला ही गोष्ट ‘आदत’च्या रेकॉर्ड दरम्यान जाणवली की, रानू या वन साँग वंडर नाहीत. तुम्ही जेव्हा आदत ऐकाल तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात येईल. त्यांचा आवाज खरोखरच शानदार आहे.


रानू मंडल ‘आदत’नंतर हिमेशसोबत ‘आशिकी में तेरी…’ साठी सुद्धा काम करणार आहे. याआधी रिलीज झालेले त्यांचे डेब्यू साँग ‘तेरी मेरी कहानी’ खूप हिट झाले. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियाने त्यांना त्याच्या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली होती.

Leave a Comment