
सध्या अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘भूल-भूलय्या’ चित्रपटाच्या सिक्वलच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन ‘भूल भुलय्या २’ चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा फर्स्टलूक रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा रंगत आहेत. तर चित्रपटात कबीरच्या प्रेमात उध्वस्त झालेली प्रिती म्हणजेच अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव समोर येत आहे.
कदाचित ‘भूल भुलय्या’च्या सिक्वलमध्ये झळकू शकते ‘ही’ अभिनेत्री?
पिंकव्हिलाने या मनोरंजन संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कियारा आडवाणी चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कियारा-कार्तिक पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. २००७ रोजी प्रदर्शित झालेला अभिनेता अक्षय कुमारच्या ‘भूल भुलय्या’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. विनोदी भयावह कथेवर आधारलेल्या ‘भूल भुलय्या’ चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते.
