‘या फोटोला कॅप्शन द्या आणि कार मिळवा’


महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक सोशल मीडियावर शेअर केलेल्या हटके बसचा फोटो सध्या युजर्सच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एका सरळ बसवर दुसरी बस उलटी ठेवलेली आहे. महिंद्रा यांनी या फोटोला क्रिएटिव्ह कॅप्शन देण्यास सांगितले आणि जो सर्वोत्तम कॅप्शन सांगेल त्याला बक्षीस देखील देण्यात येईल, असे देखील त्यांनी जाहीर केले.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. या फोटोवर तब्बल 25 हजारांपेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत, तर 12 हजार पेक्षा अधिक युजर्सनी हा फोटो लाईक केला आहे.

सर्वोत्तम कॅप्शन देणाऱ्याला आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा गाडीचे डाय-कास्ट मॉडेल देखील देणार असल्याची घोषणा केली.

यावर काँग्रेस नेते अखिलेश सिंग यांनी ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हटले.

काही युजर्सनी ‘गुरू-शिष्य’, ‘विक्रम बेताल’, ‘चक्के पर चक्का चक्के में गाड़ी, दौड़े अगाड़ी भागे पिछाड़ी, अपनी गाड़ी’ असे भन्नाट कॅप्शन देखील दिले.

Leave a Comment