गुगलवर या 10 गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते मोठे नुकसान


आज आपण सर्वच जण कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर लगेचच गुगल सर्च करत असतो. गाण्यापासून ते जेवणाच्या पदार्थांपर्यंत अनेक गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो. मात्र अनेकदा  गुगल सर्च महागात पडण्याची शक्यता असते. एका चुकीच्या सर्चमुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल गुगलवर सर्च करू नयेत.

ऑनलाइन बँकिंग वेबसाइट – आपण ऑनलाइन बँकिंग सर्विसचा वापर करण्यासाठी गुगलवर बँकेची वेबसाइट आणि युआरएल सर्च करतो. कधीही वेबसाइटचा वापर करताना बँकेच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा. बँकेने दिलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांची अधिकृत वेबसाइट नमूद केलेली असते. अनेकदा गुगल सर्च केल्यावर फेक वेबसाइटच्या लिंक समोर येतात. जर अशा फेक लिंकचा वापर करून तुम्ही बँकेच्या डिटेल्स दिल्या तर तुमची माहिती हॅकर्सला मिळू शकते व तुमच्या अकाउंटमधील सर्व रक्कम हॅकर्स काढून घेऊ शकतात.

कंपनी कस्टमर केअर नंबर – कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्टची तक्रार करण्यासाठी आपण कंपनीचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्च करतो. अनेकदा तुम्हाला गुगलवर फेक कस्टमर केअर नंबर सापडतो. तुम्ही या फेक नंबरवर कॉल करताच तुमची खाजगी माहिती हॅकर्स पर्यंत पोहचते.

अ‍ॅप अथवा सॉफ्टवेअर – आपण अनेकदा गुगलवर कोणतेही अ‍ॅप आणि सॉफ्टवेअर सर्च करत असतो. गुगल सर्चमध्ये अनेकदा फेक अ‍ॅप आणि सॉफ्टवेअर देखील असतात. हे अ‍ॅप डाउनलोड केल्याने तुमच्या डिव्हाइसला नुकसान होते. त्यामुळे गुगलवरून अ‍ॅप डाउनलोड करू नये.

मेडिकल प्रिसक्रिप्शन – आजारी पडल्यावर आपण आजाराच्या लक्षणांच्या आधारावर गुगलवर औषधे शोधू लागतो. गुगलवरून माहिती घेऊन औषध खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधे घ्यावीत.

पर्सनल फायनान्स आणि  स्टॉक मार्केटची माहिती – गुगल सर्चवर  फायनान्स आणि स्टॉक मार्केटची माहिती विश्वसनीय व्यक्तींकडूनच मिळेल असे नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.

सरकारी वेबसाइट – हॅकर्स सरकारी वेबसाइट आणि पोर्टलच्या डुप्लीकेट वेबसाइट बनवून लोकांना फसवत आहेत. सरकारी वेबसाइटच्या शेवटी gov.nic.in असे नमूद करण्यात आलेले असते. वेबसाइटची खात्री करूनच ती साइट उघडावी.

सोशल मीडिया वेबसाइट – सोशल मीडिया साइट्स देखील हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे सोशल मीडिया साइट युआरएल टाकूनच उघडाव्यात, अन्यथा तुमची खाजगी माहिती लीक होऊ शकते.

ई-कॉमर्स – शॉपिंगसाठी आपण ई-कॉमर्स वेबसाइट वापरत असतो. कधी कधी चुकून फेक ई-कॉमर्स साइटवर जर तुम्ही कार्डची माहिती दिली तर तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

एंटी व्हायरस – कधीही एंटी व्हायरस गुगलवर सर्च करू नये व डाउनलोड ही करू नये. चुकीने तुम्ही एंटी व्हायरसच्या जागी व्हायरस असणारे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. यामुळे तुमचा डिव्हाईस आणि कॉम्प्यूटर खराब होऊ शकतो.

कूपन कोड्स – कॅशबॅक आणि गिफ्टच्या नादात आपण अनेकदा गुगलवर कूपन कोड सर्च करतो. गुगलवर अनेकदा फेक कोड्स सापडतात. तुम्ही या फेक कोड्सचा वापर करताच, तुमची बँकिंग माहिती चोरीला जाते.

Leave a Comment