या व्यक्तीने चक्क खराब झालेल्या नुडल्सपासून बनवले घर


आपण सर्वचजण नुडल्सचा वापर हा खाण्यासाठीच करतो. मात्र चीनमधील एका व्यक्तीने नुडल्सचा वापर एका वेगळ्याच कामासाठी केला आहे. लवकरच बाबा बनणाऱ्या या व्यक्तीने नुडल्सचा वापर करून चक्क घर बनवले आहे. जन्माला येणाऱ्या आपल्या बाळाला गिफ्ट देण्यासाठी त्याने हे खास घर बनवले आहे.

नुडल्सचे घर तयार करणाऱ्या व्यक्तीचे नाव झांग आहे. या प्लेहाउसला बनवल्यानंतर झांगने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. झांगने सांगितले की, त्याने एक्सपायर (खराब झालेले) झालेले 2000 नुडल्स पॅकेटच्या मदतीने घर बनवले आहे. झांगने नुडल्सचा विटांप्रमाणे वापर केला आहे.

(Source)

चार स्केअर मीटरमध्ये बनलेल्या या घरात एक बेड देखील ठेवण्यात आला आहे. या बेडवर एक व्यस्क व्यक्ती सहज झोपू शकतो. घरात लाईट्स देखील लावण्यात आलेल्या आहेत. एवढेच नाही तर झांगने या घरात खिडकी देखील बनवली आहे.

(Source)

झांगने सांगितले की, त्याचा एक मित्र नुडल्सचा होलसेलर आहे. त्याच्याकडे एक्सपायर झालेल्या नुडल्सचा एक लॉट पडलेला होता. तो मित्र हे खराब झालेले नुडल्स टाकून देणार होता. मात्र झांगने त्याला थांबवत ते नुडल्स स्वतः घेतले व त्याचे घर बनवले.

(Source)

सोशल मीडियावर झांगच्या या घराची जोरदार चर्चा सुरू आहे. युजर्सला झांगचे नुडल्सचे घर खुपच आवडले आहे. मात्र अनेकजण यावर टीका देखील करत आहेत. खराब झालेले नुडल्स लहान बाळाने खाल्ले अथवा खराब झालेल्या नुडल्समुळे कीडे आणि आजार देखील होऊ शकतो. त्यामुळे काही युजर्सनी बाळासाठी असे घर बनवू नये, असा देखील सल्ला दिला.

 

Leave a Comment