फोनच्या बॅटरीवरून ठरतो मनुष्याचा स्वभाव, अभ्यासकांचा दावा


आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे. हाच फोन आता लोकांच्या आनंदाचे, सकारात्मक राहण्याचे देखील कारण ठरत आहे. एका अभ्यासात समोर आले आहे की, ज्या व्यक्तींच्या फोनची बॅटरी फुल चार्ज असते, अशा व्यक्तींना सकारात्मक वाटत असते. फुल चार्ज बॅटरी असलेला मोबाईल घेऊन ते कोठेही जाऊ शकतात. तर अर्ध्यापेक्षा कमी बॅटरी चार्ज असणाऱ्या व्यक्तींमध्ये नकारात्मक भावना वाढते.

या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांना विचारण्यात आले की, दिवस मावळत आल्यावर तुमच्या मोबाईलमधील बॅटरीचा आयकॉन बघून कसे वाटते. यावर सदस्यांनी बॅटरी फुल चार्ज असल्यावर आनंद वाटतो, तर 50 टक्के बॅटरी पाहून चिंता वाटते, असे उत्तर दिले. तसेच 30 टक्क्यांवर बॅटरी आल्यावर चिंतेत अधिक वाढ होते.

तंत्रज्ञानाने प्रत्येकाचे आयुष्य कंट्रोल केले आहे तर फोनच्या बॅटरीवर मनुष्याचा स्वभाव अवलंबून आहे. लोकांचा मेंदू हा फोनच्या बॅटरीनुसार काम करतो. लंडन युनिवर्सिटीते मार्केटिंग रिसर्चर थॉमस रॉबिन्सन आणि फिनलँडच्या अल्टो युनिवर्सिटीच्या रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे.

अभ्यासामधून समोर आले की, ज्या लोकांची बॅटरी नेहमी चार्ज असते अशा लोकांमध्ये कामासाठी भरपूर उर्जा असते. ते व्यवस्थित ऑर्गनाइज्ड असतात. तसेच, ज्या लोकांची बॅटरी कमी असते, असे लोक नकारात्मक आणि अव्यवस्थित असतात.

संशोधकांनी या अभ्यासासाठी लंडनमधील 23-57 वर्षांच्या 22 लोकांचे सर्वेक्षण केले. ज्यांच्या फोनची बॅटरी नेहमी कमी असते, असे लोक दुसऱ्यांवर निर्भर असतात.

 

Leave a Comment