मोदींना शुभेच्छा देऊन टीकेच्या धनी झाल्या अमृता फडणवीस


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना, अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. देश राष्ट्रपिता म्हणून केवळ महात्मा गांधी यांचाच उल्लेख करतो पण अमृता फडणवीस यांनी थेट मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असे म्हटले आहे.


अमृता फडणवीस यांनी या ट्विटसोबत ओ रे मनवा तू तो बावरा है, हे स्वत:च्या आवाजात गायलेले गाणे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळ्या वाजवताना दिसतात. यापूर्वी त्यांच्या सेल्फीमुळे अमृता फडणवीस वादात अडकल्या होत्या. मुंबई ते गोवा या जलमार्गावरील ‘आंग्रीया’ क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढला होता. त्यांनी सुरक्षा रक्षकांना डावलून सेल्फी घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

Leave a Comment