
काही महिन्यांपूर्वीच अभिनेता विवेक ऑबेरॉय अभिनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण आता त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करण्याच्या बेतात बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे देखील आहेत. बाहुबली स्टार प्रभास हा या चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चा आहेत.
संजय लीला भन्साळी बनवणार मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट
या आगामी चित्रपटाचे नाव ‘मन बैरागी’ असे आहे. आपल्यासाठी हा चित्रपट खूप खास असल्याचे संजय लीला भन्साळी यांनी म्हटले आहे. त्यांनी या चित्रपटाची घोषणा मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत केली आहे.
हा चित्रपट बनवण्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे, मोदींचे आयुष्य हे सार्वभौमिक अपिल आणि एक विशेष संदेश देणारे आहे. त्यामुळे आपण हा चित्रपट तयार करणार असल्याचे भन्साळींनी म्हटले आहे. प्रभास देखील त्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर लाँच करणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातारण आहे. दोनवेळा निवडणुका जिंकून मोदींनी आपलं सरकार स्थापन केलं आहे. बॉलिवूडमधुनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
