या प्रसिद्ध अभिनेत्रीला आहे झोपेत चालण्याची सवय


सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत काम केलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूझ बरीच चर्चेत आहे. त्याचबरोबर ती सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करतच असते. तिने नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधून मला झोपेत चालण्याची सवय आहे असा नवीन खुलासा केला आहे. चाहतेही तिचे हे ऐकून अवाक् झाले आणि तिच्या चाहत्यांनी इलियानाच्या काळजी पोटी तिला अनेक सल्ले दिले आहेत.


आपल्या ट्विटमध्ये इलियाना म्हणते की, मी या गोष्टीला आता पूर्णपणे स्वीकारले आहे की मला झोपेत चालण्याची सवय आहे. माझ्या पायाला सकाळी उठल्यावर सूज असते किंवा एखादी छोटी जखम तरी असते. यामागचे कारण हेच असावे. इलियानाच्या ट्विटवर उपाय सांगत तुझ्या बेडरुममध्ये कॅमेरा लावून ठेव, त्यामुळे तुला झोपेत चालण्याच्या सवयीबद्दल स्पष्टपणे समजेल, असा सल्ला एकाने दिला. तर दुसऱ्याने तिला डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यास सांगितले.


सोशल मिडियावर बरीच चर्चेत असलेली इलियाना सध्या मात्र चित्रपटांपासून दूर आहे. पण तिचे खाजगी आयुष्य बरेच चर्चेत आहे. नुकतेच तिचे ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्र्यू नीबोन याच्याशी ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. सोशल मीडियावर या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. इलियानाने तिच्या इन्स्टाग्रामवरून अँड्र्यूसोबतचे फोटो डिलीट केले. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

Leave a Comment