सोशल मीडियात व्हायरल होत आहेत माहीच्या बायकोचे हॉट फोटो


सध्या सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झालेला टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्र सिंह धोनी याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा धुमाकूळ घालत आहेत. मुलगी झिवाचे धोनीने शेअर केलेले व्हिडिओ एवढे व्हायरल होतात की लोक तिच्या क्यूटनेसची चर्चा करत राहतात. तिच्या पाठोपाठ सध्या सोशल मिडियावर तिच्या आईने म्हणजेच साक्षीने धुमाकूळ घातला आहे.


आपल्या मैत्रिणींसोबत साक्षी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी इटलीमध्ये गेली आहे. सध्या सोशल मिडियावर या सुट्टीचे तिचे हॉट फोटो व्हायरल होत आहे. तिचा बोल्ड आणि अनोख अंदाजात तिची ग्लॅमरस झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी तिच्या या हटके स्टाईलच्या फोटोंचे भरभरून कौतुक केले आहे तर दुसरीकडे धोनीच्या चाहत्यांनी हे फोटो पाहून तिला बहूमोलाचे सल्लेही दिले आहेत.


साक्षीने या फोटोत पिवळा रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करून आपल्या मैत्रिणींसोबत फोटो टाकले आहेत. सोशल मीडियावर साक्षीच्या ड्रेसची आणि स्टाईलचीही चर्चा होत आहे.


तिच्या या फोटोंना लव्ह यू भाभी, द एंजल असे कमेंट्स देण्यापासून ‘धोनी आडनाव नसेल तर तू काही नाही आहेस, त्यामुळे असे फोटो अपलोड करता दोनदा विचार कर’ असा एकाने सल्ला दिला आहे.

View this post on Instagram

🥰

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on


तर आमच्या धोनीची तू बायको आहेस त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून असे फोटो अपलोड कर असा सल्ला एम एस धोनीच्या चाहत्यांनी दिला आहे.


सध्या दोन महिने क्रिकेटपासून टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी लांब आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरोधात शेवटचा सामना धोनीने खेळला होता. त्यामुळे धोनी नक्की निवृत्ती घेणार आहे की विश्वचषक स्पर्धेसाठी विश्रांती घेत आहे याबाबत चर्चा सुरू आहेत.

Leave a Comment